Aashay Books
आहार
आहार
Couldn't load pickup availability
आहारशास्त्र ही विज्ञानशाखा नवीनच असली, तरी आता त्याविषयी भरपरू माहिती आणि ज्ञान उपलब्ध आहे; पण बहुतांश पुस्तकं ही ‘वजन वाढवा - वजन घटवा' हे सांगणारी किंवा फार फार तर मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार कसे नियंत्रणात आणायचे अशा आशयाची असतात. हे पुस्तक मात्र सर्वार्थाने संसर्गजन्य आजार, विभिन्न प्रकारचे कर्करोग, पचनसंस्थेचे आजार, खाण्याबद्दलचे मानसिक विकार, हृदय, किडनी, यकृत, पित्ताशय, पँक्रियाज यांचे आजार आणि अभावजन्य आजार अशा जवळपास सगळ्याच आजार-विकारांमध्ये कोणता आहार घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करते. या पुस्तकात व्हिटॅमिन्स व प्रोटीन्स या अन्नघटकांची ओळख आणि त्यांच्या संशोधनाची रोचक कथा आहे, तसेच आहारातील घटकांचा पोषणशास्त्राच्या दृष्टीनं आणि जैव-रसायनशास्त्राच्या दृष्टीनं (बायोकेमिस्ट्री) केलेला विचार आहे. हे पुस्तक सर्व वयोगटांतल्या वाचकांसाठी, आहारशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी, आहारतज्ज्ञांसाठी आणि निरोगी व शतायुषी होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.
Share

