Aashay Books
द डिसिप्लिन्ड ट्रेडर
द डिसिप्लिन्ड ट्रेडर
Couldn't load pickup availability
द डिसिप्लिन्ड ट्रेडर’ मुळे ट्रेडरना बाजारातील वेगवेगळ्या परिस्थितींना आणि संधींना उचित व आपल्याला लाभदायक ठरणारा प्रतिसाद देण्याच्या महत्त्वाच्या विचारप्रक्रिया आणि कृती शिकण्यास मदत होते. अनुभवी ब्रोकर, फ्युचर्स ट्रेडर आणि ट्रेडिंग प्रशिक्षक मार्क डग्लस यांनी त्यांच्या सुरुवातीच्या ट्रेडिंगविषयक अनुभवांबर सखोल विचार केला. त्यानंतर बहुतेक ट्रेडरना ज्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं ती आव्हानं त्यांनी शोधून काढली आणि त्यांना तोंड दिलं. यालाच ते आपल्या स्वतःविषयीची ‘जाणीव जबरदस्तीनं करून घेणं’ भाग पडणं असं म्हणतात.
ट्रेडिंगमधून संपत्ती गोळा करण्यासाठी आणि ती तशीच टिकवून ठेवण्यासाठी अद्वितीय मानसिक कौशल्यांची गरज असते, तर ही कौशल्यं शिकण्यासाठी आणि त्यांना मनावर बिंबवण्यासाठी संघटित आणि पद्धतशीर दृष्टिकोन आवश्यक असतो. या दृष्टिकोनातून यशाची मनोरचना तयार करता येते. ‘द डिसिप्लिन्ड ट्रेडर’ हे पुस्तक ही मनोरचना तयार करण्यास आणि तिच्या साहाय्यानं कोणत्याही ट्रेडरच्या मनातील पैसा गमावण्याच्या, पराभूत होण्याच्या भीतीचं जिंकण्याच्या प्रवृत्तीत रूपांतर करण्यास मदत करत
Share
