Aashay Books
पैशाची गोष्ट
पैशाची गोष्ट
Couldn't load pickup availability
पैसा आपल्याला भेडसावणारा प्रश्न किंवा आयुष्याचा आनंद लुटण्याच्या मार्गातला अडथळा बनू नये असं वाटत असेल तर… पैशाबद्दल स्पष्ट बोलायचं म्हटलं तर… ते काही सोपं नाही. खरंतर, पैसा म्हणजे इथून तिथून टाळण्याचाच विषय असतो. इतकच नव्हे, तर पैसा हा आपल्या जीवनातील एकमेव विषय नसला तरी, प्रमुख चिंतांपैकी एक विषय नक्कीच बनला आहे. आणि तसं पाहिल, तर पैसा हा स्वत:च, ना चांगला असतो ना वाईट असतो. तो आपल्याला बंदिस्त करून ठेवतो आहे की आपल्या स्वातंत्र्याची किल्ली बनतो आहे ह्या प्रश्नाचं उत्तर, आपले त्याच्याबरोबरचे संबंध कसे असतातं ह्यावर ठरत असतं. जर का पैशाबरोबरच्या आपल्या संबंधांची आपण पूर्णपणे जाणीव ठेवली आणि त्या संबंधाकडे पूर्णपणे लक्ष दिलं, तर आपण आपल्या वैयक्तिक संपत्तीबरोबर निकोप आणि सकारात्मक संबंध निर्माण करू शकतो; मग आपली मिळकत कितीही भरभक्कम असो किंवा कितीही तुटपुंजी असो. क्रिस्टिना बेनितो ह्या लेखिकेचं ह्या पुस्तकामागचं तत्त्वज्ञानच ते आहे.
Share
