Aashay Books
मटिल्डा
मटिल्डा
Couldn't load pickup availability
अजरामर बालसाहित्यातली ही एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी, आपल्याला मटिल्डा वर्मवुड या लहानग्या मुलीच्या दुनियेत घेऊन जाते. आपल्या वयाच्या इतर मुलांपेक्षा अत्यंत हुशार असलेल्या आणि खास शक्ती लाभलेल्या मटिल्डाचा भाऊ मात्र फार आळशी असतो आणि आईबाबा अतिशय त्रास देणारे. त्या तिघांकडून तिला कायमच उपेक्षित वागणूक मिळत असते. तिच्या सतत पुस्तकं वाचण्याच्या सवयीवरून ते तिचा पदोपदी अपमान करत असतात; पण तिच्या मनाच्या शक्तीमुळे ती हे सगळं नीट निभावून नेते. लहान मुलांसारखी निरागसता आणि जादूने भरलेल्या या गमतीशीर गोष्टीत मटिल्डा आपल्या परिस्थितीशी लढण्यात यशस्वी होते का? वाचकांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये सारखीच लोकप्रिय ठरलेली ही कलाकृती तुम्हाला या अत्यंत हुशार आणि असामान्य शक्ती लाभलेल्या मुलीच्या निरागस दुनियेची आनंददायक सफर घडवून आणेल!
Share
