Aashay Books
मुळशी सत्याग्रह
मुळशी सत्याग्रह
Couldn't load pickup availability
मुळशी धरणग्रस्तांच्या लढ्याला आज शंभराहून अधिक वर्षे पूर्ण झाली. त्या मुळशी सत्याग्रहाची कहाणी सांगणारे पुस्तक लढ्याचे प्रवर्तक विनायक भुस्कुटे यांनीच जवळजवळ 80 वर्षांपूर्वी लिहिले. या पुस्तकाचे पुनःप्रकाशन करून पुस्तक मुळशी धरण भागातील गावांच्या प्रत्येक घरात पोहोचवण्याचा उपक्रम स्तुत्य आहे आणि येथील लोकांना, विशेषतः तरुण पिढीला नक्कीच माहिती देणारा आणि प्रेरित करून संघर्ष बळकट करणारा ठरेल.हे पुस्तक मुळशी धरणग्रस्तांच्या लढ्याच्या पलीकडे जात स्वातंत्र्यलढ्याच्या काही मौलिक पैलूंवर प्रकाशझोत टाकते. 1921च्या काळात गांधीवादी विचारांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जरी शिरकाव झालेला असला, तरी सत्याग्रह आणि अहिंसा यांचा प्रत्यक्ष आंदोलनात वापर अजून तरी मोठ्या प्रमाणात झाला नव्हता. अशा परिस्थितीत तत्कालीन मुंबई प्रांतातील अति दुर्गम भागातील मावळ्यांनी, साधा सार्वजनिक प्रतिकार कसा करायचा हे माहीत नसतानाही, भुस्कुटे यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन सुरुवातीला अहिंसक मार्गाने सत्याग्रह करून यश संपादन केले होते. ते या पुस्तकात तपशीलवार दिले आहे.
Share

