Aashay Books
मोठ्या चुका करा मोठे यश मिळवा
मोठ्या चुका करा मोठे यश मिळवा
Couldn't load pickup availability
हे पुस्तक वाचत असताना कदाचित तुम्हांला वाटेल की आपण आतापर्यंत घेतलेल्या सर्व पुस्तकांमधलं हे अगदी निरुपयोगी पुस्तक आहे. कारण तुम्हांला माहीत नाही, असं यात काहीच नाही. आणि खरंच! हे पुस्तक तुम्हांला कसलाही साक्षात्कार घडवण्यासाठी नाहीच. केवळ आठवण करून देण्यासाठी आहे. आठवण! आपल्या सर्वांचाच जीवनप्रवास कसा घडत असतो याची आठवण. अगदी सहज- पण अगदी वेगळ्या ढंगानं करून दिलेली आठवण. म्हणूनच हे पुस्तक तुम्हांला नवीन असं काहीच सांगत नाही, तर तुमच्याच विचारांना शब्दांत मांडतं. असे विचार, जे आपल्या सर्वांच्या मनात सातत्यानं येत असतात; पण त्यांचा ‘विचार' मात्र क्वचितच केला जातो. हे पुस्तक तुमचं आयुष्य बदलून टाकणारं नाही, तर तुमची जाणीव वाढवणारं आहे. ज्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यातले निर्णय अजाणतेपणानं नाही तर जाणीवपूर्वक घेऊ शकाल.
Share

