Skip to product information
1 of 1

Aashay Books

रेनेसॉन्स स्टेट

रेनेसॉन्स स्टेट

Regular price Rs. 359.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 359.00
Sale Sold out

हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या प्रदीर्घ आणि संघर्षमय इतिहासाचे चित्तवेधक कथन आहे. या पुस्तकात महाराष्ट्र या महान राज्याच्या 2,000 वर्षांच्या अस्तित्वातील महत्त्वाची तत्थे आणि पैलू यांची नोंद आहे. या पुस्तकात लेखक महाराष्ट्र प्रदेशाची कथा सांगत आहेत. या प्रदेशाच्या राजकारणाला, समाजाला आणि इतिहासाला कवेत घेत या कथनाचा व्यापक पट सातवाहनांपासून ते वर्तमानापर्यंत उलगडत, हे पुस्तक क्वचितच ज्ञात असणाऱ्या कथांची नोंद करतं : बलशाली मुगलांना गुडघे टेकायला लावणारं साम्राज्य, वैवाहिक लैंगिक संबंधांमध्ये संमतीचा प्रश्न थेट राणी व्हिक्टोरियापर्यंत नेणारी एक स्त्री, काळाच्या कित्येक योजने पुढे असलेले समाजसुधारक, जीवनाच्या विभिन्न क्षेत्रांत अग्रेसर राहिलेले स्त्री-पुरुष, डाव्या-उजव्या विचारांच्या तसेच दलित अस्मितेच्या चळवळींची उत्क्रांती, गांधींचे मार्गदर्शक आणि गांधींचे मारेकरी या सर्वांसह या प्रदेशाच्या उत्तरेतील सत्ताकेंद्रांशी संघर्ष करण्याच्या प्रदीर्घ परंपरेलाही हे पुस्तक उजाळा देतं. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या जडणघडणीचा हा असा लेखाजोखा आहे, जो इथल्या अभिमानी जनतेस पात्र आहे; मात्र जो आजवर अलिखितच राहिला होता.

View full details