Aashay Books
वन अप ऑन वॉल स्ट्रीट
वन अप ऑन वॉल स्ट्रीट
Couldn't load pickup availability
फिडेलिटीच्या अब्जावधी डॉलर्सच्या मॅगेलन फंडाचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या पीटर लिंच यांनी फंडाच्या नेत्रदीपक कामगिरीचे रहस्य या पुस्तकात उदाहरणे देऊन सोप्या शब्दांत उलगडून दाखवले आहे. लिंच यांनी जॉन रॉथचाइल्ड यांच्याबरोबर यशस्वी शेअरची निवड अंदाजपंचे न करता अचूक रितीने करण्यासाठी कंपनीच्या ताळेबंदातील कोणते आकडे महत्त्वाचे आहेत याचे पायरी-पायरीने मार्गदर्शन केले आहे. टेनबॅगर शेअर वेळीच कसा टिपावा आणि चक्रीय, वेगाने वाढणाऱ्या आणि पुनरुज्जीवन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना कोणती पथ्ये पाळावीत याचे सूत्र त्यांनी या पुस्तकात सांगितले आहे. या पुस्तकातून लिंच यांनी शेअरबाजारातील चढ-उतार आणि व्याजदरात सतत होणारे फेरबदल यांच्याकडे दुर्लक्ष केले तर दीर्घकालीन (पाच ते दहा वर्षं) गुंतवणुकीतून घसघशीत लाभ मिळणे शक्य आहे, याची एक प्रकारची हमी दिलेली आहे.
Share

