Aashay Books
एकाग्र मनाचे सामर्थ्य
एकाग्र मनाचे सामर्थ्य
Couldn't load pickup availability
विचलितपणा, चिंता, तणाव, काळजी, भीती हे सगळे मानसिक विकार आहेत. त्यांच्याबाबतीत वेळीच जागे झाले नाही, तर ते शारीरिक आजारांच्या रूपातदेखील उद्भवतात. एक हिंदू पंडित आणि आंतरराष्ट्रीय वक्ते म्हणून लेखकाने या विचारसंपन्न अशा नवीन पुस्तकात सप्रमाण दाखवून दिले आहे की, ‘एकाग्रता' या एका कौशल्यावर प्रभुत्व मिळवून आपण या मानसिक अडथळ्यांना पूर्णपणे नाहीसे करू शकतो. मनाला योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी, त्याचा उपयोग करून घेण्यासाठी, तसेच इच्छाशक्ती कणखर करण्यासाठी आणि मनातल्या जाणिवेवर जागरूकपणे नियंत्रण ठेवण्यासाठी लेखकाने या पुस्तकातून व्यावहारिक तसेच क्रमशः उलगडत जाणारे उपाय सांगितले आहेत. तुम्हाला अधिक चांगले पालक व्हायचे असेल, तुम्ही नेते असाल किंवा फक्त श्रोते जरी असलात तरीही हे पुस्तक तुम्हाला एकाग्रतेच्या कौशल्याचा सराव केल्याने उत्पादकता, नातेसंबंध, मानसिक आरोग्य आणि आनंद या सर्व गोष्टींमध्ये कशी कमालीची सुधारणा होते याविषयी सांगते. प्रस्तुत पुस्तक, जाणिवेला आणि ऊर्जेला आपल्या जीवनातील उद्दिष्टांच्या दिशेने वळवण्याची क्षमता प्रदान करते.
Share
