Aashay Books
द मिरॅकल मॉर्निंग
द मिरॅकल मॉर्निंग
Couldn't load pickup availability
या पुस्तकाने लाखो लोकांना त्यांना हवं असलेलं जीवन निर्माण करण्यासाठी मदत केली आहे. तसं जीवन निर्माण करण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारच्या व्यक्ती होण्याची गरज होती, त्या प्रकारच्या व्यक्ती होण्यास या चमत्कारानं त्यांना मदत केली आहे. लेखकाची एस.ए.व्ही.ई.आर.एस. ही क्रांतिकारक पद्धत साधी आणि प्रभावी आहे. रोज फक्त 6 मिनिटे इतका अल्प वेळ काढल्यामुळेही या प्रक्रियेतून तुमच्या जीवनात टप्प्याटप्प्याने कायापालट घडून येतो. प्रत्येक दिवसाची सुरुवात सहेतुक शांततामय अवस्थेतून केल्यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक स्पष्टतेत सुधारणा होते. सकारात्मक पुष्टीदायक विधानांमुळे तुम्हाला मर्यादा घालणाऱ्या अगर दुःखी करणाऱ्या कोणत्याही भीतीवर मात करण्यासाठी मनाची पुनर्रचना केली जाते. रोज आपल्या उत्तम स्वरूपात आणि उत्तम अवस्थेत राहून आपण काम करत असल्याचे, वागत असल्याचे कल्पनाचित्र नजरेसमोर आणण्याच्या सरावातून या सरावाच्या ताकदीचा अनुभव येतो. 60 सेकंद इतका अत्यल्प वेळ व्यायाम करूनही तुमच्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जेला गती देता येते. तज्ज्ञांच्या साहित्याचे वाचन करून ज्ञान मिळवता येते आणि आपल्या क्षमतांमध्ये वाढ करता येते. गाढ कृतज्ञता वाटावी, अंतर्दृष्टी प्राप्त व्हाव्यात, प्रगतीचा आढावा घेता यावा आणि आपल्या सर्वोच्च प्राधान्यांना स्पष्टपणे लक्षात घेऊन आपल्या उत्पादकतेत वाढ करता यावी, यासाठी लेखनाचा सराव केला पाहिजे.
Share
