Skip to product information
1 of 1

Aashay Books

बुद्ध नेतृत्व आणि यशप्राप्तीसाठी अध्यात्म

बुद्ध नेतृत्व आणि यशप्राप्तीसाठी अध्यात्म

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 199.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out

बुद्ध हा जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे, हे निर्विवाद सत्य आहे. गेल्या अडीच हजारहून अधिक वर्षांपूर्वी या असामान्य माणसानं बौद्ध धर्माची स्थापना केली. बौद्ध धर्म सर्व मूल्यवान शिकवणुकींना प्रोत्साहन देतो. अनेक महान नेत्यांनी उत्कृष्ट नीतिमूल्यांबद्दल बौद्ध धर्माची आणि त्याच्या अनुयायांची प्रशंसा केली आहे. बुद्धानं कधीही स्वतःकडे नेता म्हणून पाहिलं नसलं आणि त्याने कधीही नेता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली नसली, तरी बुद्ध हा नेहमीच आजच्या अनेक जागतिक नेत्यांचं प्रेरणास्थान आहे. या पुस्तकात बुद्धाच्या अनेक विद्वत्तापूर्ण, गहन आध्यात्मिक आणि तरीही व्यवहार्य असलेल्या उपदेशपर शिकवणुकी आणि त्याने दिलेले धडे समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांच्यातून सक्षम उत्कृष्ट नेता कसं व्हावं आणि आयुष्यात यशाची प्राप्तीही कशी करून घ्यावी हे शिकता येतं.

View full details