Aashay Books
सावरकर - विस्मृतीचे पडसाद 1883-1924
सावरकर - विस्मृतीचे पडसाद 1883-1924
Couldn't load pickup availability
हिंदुत्व विचारसरणीचे वैचारिक स्रोत असलेले सावरकर हे निःसंशयरीत्या विसाव्या शतकातील सर्वांत वादग्रस्त ठरलेले विचारवंत आणि नेते होते. एकीकडे उदात्तीकरण करणारी स्तुती तर दुसरीकडे त्यांना आसुरी ठरवणारी निंदा या दोन टोकांत त्यांच्या दीर्घ आणि वादळी जीवनाची कथा दोलायमान झाली आहे. या दोन टोकांमध्ये असलेले सत्य दुर्दैवाने कधीच सामोरे आणले गेले नाही. ते आणि त्यांची विचारसरणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विशेषतः महात्मा गांधींची, त्यांच्या अहिंसेची प्रबळ आणि प्रखर विरोधक म्हणून समोर येते.
जगभरातील आणि भारताच्या अभिलेखागारांतील मूळ कागदपत्रांचे विस्तृत संशोधन करून दोन खंडात्मक चरित्र साकार झाले आहे. त्यापैकी या पहिल्या खंडात सावरकरांचा त्यांना जन्मठेपेकडे घेऊन जाणारा प्रवास ते अखेर काळ्यापाण्यातून मुक्तता होईपर्यंतचा जीवनपट मांडण्यात आला आहे. यातून सावरकर, त्यांचे व्यक्तिमत्त्व, विचारसरणी यांबद्दलचा नवीन दृष्टिकोन समोर येतो आणि त्यांच्या यशापयशावर एक नवा प्रकाश पडतो.
Share

